ध्यान साधनेतून विश्वशांतीचा संदेश देणारे मंदार आपटे | गोष्ट असामान्यांची भाग ४७ | Mandar Apte

2023-07-12 2

मंदार आपटे हे अमेरिकेतील पोलीस, सैनिक, हिंसेचे बळी ठरलले लोक, तुरुंगातून बाहेर आलेल्या गॅंगस्टर्सना ध्यान साधना म्हणजेच मेडिटेशन शिकवतात. मंदार आपटे हे मुळचे मुंबईचे आहेत. गेली २८ वर्षे ते अमेरिकेत स्थायिक होते. तिथल्या शेल कंपनीत ते अधिकारी पदावर कार्यरत होते. तेव्हा कंपनीतील काही लोकांना त्यांनी मेडिटेशनचे धडे द्यायला सुरुवात केली. मेडिटेशनचा स्वतः अनुभव घेताना त्यांना हे लक्षात आलं की, यामुळे लोकांमध्ये सकारात्मक बदल घडू शकतो. याच कल्पनेतून त्यांनी कॉर्पोरेट कंपनीमधील आपली नोकरी सोडून २०१९ साली Cities4Peace या संस्थेची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी हजारो लोकांमध्ये सकारात्मक परिवर्तन घडवलं आहे. सध्या ते मुंबईतून मेडिटेशनचे ऑनलाईन सेशन घेतात. https://mandarapte.net/cities4peace/

Videos similaires